रौप्य महोत्सवी वर्ष २०१०-११

ताजी फुले ....

'ताजी फुले' हे नवीन सदर आजपासून प्रसिद्ध करीत आहोत. वाचा एक नवी कविता या ब्लॉगवर...........

आठवणींचे गहिरे अलगुज

आठवणींचे गहिरे अलगुज
ओघळलेला हवा सूर
मिटमिटलेल्या पाउलवाटा
फांदीवरती धुके नि धूर ...

क्षितिज जरासे होत जांभळे
ढगात उगवे लालट साय
मी मौनाच्या काठावरती
मनातले तुज सांगू काय ...

वार्‍यावर पानांची सळसळ
कुठे मिणमिणे क्षीण दिवा
आणि किरमिजी कौलारावर
विसावलेला संथ थवा ...

विरघळताना सांज सावल्या
आज कशाने श्वास अडे
पुन्हा दाटता गहिर्‍या वेळी
थे कुणावर जीव जडे ...

कवी डों. शंतनू चिंधडे
मो. - ९८६०३३७४८३
ईमेल - drshantanuchindhade@yahoo.com