रौप्य महोत्सवी वर्ष २०१०-११

वृत्त आणि निवेदने

निवेदने:
१. रविंद्र पिंगे व्यक्ति आणि वाङमय चर्चासत्र
ज्येष्ठ ललित लेखक रविंद्र पिंगे व्यक्ति आणि वाङमय या विषयांतर्गत शब्दवैभव साहित्यप्रेमी मंडळा तर्फे चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. साहित्यप्रेमींनी डॉ. शंतनू चिंधडे यांच्याशी संपर्क साधावा.

माहिती संपर्क पत्ता: - डॉ. शंतनू चिंधडे, प्रेस्टीज चेंबर्स साई पंपा समोर, जंगली महाराज रस्ता डेक्कन, पुणे - ४११००४.
मो. - ९८६०३३७४८३

२."कवितेची कार्यशाळा"
शब्दवैभव साहित्यप्रेमी मंडळा तर्फे छंदो रचना, सादरीकरण आणि कवितेचा आशय
अशा विषयांवर आधारित कवितेची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. कवी आणि काव्य रसिकांनी डॉ. शंतनू चिंधडे यांच्याशी संपर्क साधावा.

माहिती संपर्क पत्ता: - डॉ. शंतनू चिंधडे, प्रेस्टीज चेंबर्स साई पंपा समोर, जंगली महाराज रस्ता डेक्कन, पुणे - ४११००४.
मो. - ९८६०३३७४८३
ईमेल - drshantanuchindhade@yahoo.com

कविसंमेलन - 
शब्दवैभव साहित्यप्रेमी मंडळा तर्फे कविसंमेलन होणार आहे. इछुक कवी कवयित्रीनी डॉ. शंतनू चिंधडे यांच्याशी संपर्क साधावा ही आग्रहाची विनंती.
संपर्क - ९८६०३३७४८३
ईमेल - drshantanuchindhade@yahoo.com

वृत्त:
 शब्दवैभव साहित्यप्रेमी मंडळा तर्फे २३ जानेवारी २०११ रोजी ना. सी. फडके सभागृहात साहित्यिक मेळावा पार पडला.  डॉ. स्नेहल तावरे  ह्या या वेळी प्रमुख  पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
पहिल्या सत्रात कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शंतनू चिंधडे यांनी केले. विंदा करंदीकर यांच्या कवितांवर आधारित तसेच डों शंतनू चिंधडे यांनी प्रकशीत केलेल्या १८ प्रातिनिधिक  काव्यसंग्रहांवर आधारीत काव्यमैफिलींचे सादरीकरण झाले. गीतांजली जोशी, सोनाली अडकर, श्रुति विश्वकर्मा, अपर्णा चितळे, प्रणव बापट, सुजीत कदम, दीपाली आणि मुकुंद दातार हे या काव्यमैफिलीत सहभागी झाले होते.  त्यानंतर शब्दवैभवच्या राजा फोपे, सुनन्दा पानसे, सुनील मराठे अशा कवि- कवयित्रीनी  काव्यचिंतन आणि मनोगत व्यक्त केले.
दुसर्‍या सत्रात डॉ शंतनू चिंधडे  यांच्याशी साहित्यिक गप्पा झाल्या. ज्योत्स्ना चांडगुडे, अरुण देशपांडे, अविनाश वाघमारे यांनी छान छान प्रश्न विचारून डॉ शंतनू चिंधडे  यांना खुलवले. शब्द वैभवची वाटचाल आणि ह्या मागची डॉ शंतनू चिंधडे  यांची भूमिका या निमित्त्याने रसिकांसमोर आली.   
काही निवडक कवींच्या कवितांचे सादरीकरण या वेळी झाले.  योगायोग असा की हे मंडळाचे १०० वे कविसंमेलन होते. कविसंमेलनाचे सूत्र संचालन प्रणव बापट या तरुण कवीने अतिशय नेमकेपणाने केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ स्नेहल तावरे यांनी सुंदर आणि मार्गदर्शनपर असे अध्यक्षीय भाषण केले. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची आणि साहित्यिक मेळाव्याची सांगता झाली.