रौप्य महोत्सवी वर्ष २०१०-११

Sunday, January 2, 2011

शब्दवैभवचा काव्यबहर

  • समविचारी साहित्यप्रेमी मित्रमंडळींच्या सहकार्याने १९८६ साली सप्टेंबर महिन्यात मंडळाची स्थापना.
  • सातत्य, साहित्य आणि सौहार्द ही त्रिसूत्री मनात योजून वाटचाल सुरू केली.
  • महिन्यातून किमान एक वांङ्यीन बैठक आयोजित केली. अशा आतापावेतो ४८७ बैठका पार पडल्या. उपस्थिती ८ ते १०.
  • या बैठकतून साहित्य सादरीकरण, परस्पर परिचय, वांङ्यीन चर्चा आणि वाचन मार्गदर्शन असा कार्यक्रम सतत राबवला.
  • मंडळात नवीन कवि-लेखकांचा वावर असावा म्हणून जाहीर कविता वाचनाचे कार्यक्रम करीत आलो आहोत. आतापावेतो ९९ कविसम्मेलने पार पडली असून एकूण तीन हजारांचेवर नव्या जुन्या कवींनी स्वरचित कविता सादर केल्या आहेत.
  • ही कविसम्मेलने एक प्रकारे छोट्या प्रमाणातली कविता-कार्यशाळाहोईल अशा रीतीने सूत्रसंचालन केले जाते.
  •  कवितेतील विविध प्रकार, विविध लयी, वेगवेगळे छंद, वेगवेगळी वृते इत्यादींचा अधिक अभ्यास व्हावा या हेतूने मंडळाने पूर्ण दिवसाच्या एकूण  स्वतंत्र कार्यशाळा आतापावेतो आयोजित केलेल्या आहेत.
  • अनेक कवींना आपल्या रचना लिखित माध्यमातून रसिक-वाचकांपर्यंत पोहोचाव्यात अशी सूचना आल्यामुळे निवडक कवींच्या निवडक कविता प्रातिनिधिक कविता संग्रहात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
  • मंडळाचे आतापावेतो १८ प्रातिनिधिक कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत.
  • एकूणच मंडळाचा हेतू आणि उद्दिष्टे वांङ्य प्रेम विकसित व्हावे आणि (निर्मितीक्षम) लेखन उर्मी जागृत राहाव्यात ही आहेत.
  • मंडळाकोणत्याही प्रकारे कार्यकारिणी चौकट नाही. सर्वचजण कार्यकर्ते आणि संघटक. सभासद वर्गणी नाही.